लोणावळा शहर पोलिसांची दमदार कामगिरी,, अवैध माल वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या..

0
868
लोणावळा : मुंबई पुणे महामार्गावर हॉटेल सेंटर पॉईंट येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा आयषर टेम्पो सह 35 लाखाचा अवैध गुटखा लोणावळा शहर पोलीसांच्या ताब्यात.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.01/02/2022 रोजी लोणावळा पोलीस स्टेशन हददीतील पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसेच मुंबई पुणे महामार्गाने अवैध माल मुंबई पुणे येथे जात असल्याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील तसेच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व उपविभागीय कार्यालयाचे पोलीस हवालदार एम. बी . गोफणे , पोलीस कॉन्स्टेबल अंकुश पवार यांच्या गोपनीय माहीतीनुसार लोणावळा शहर पोलीस डी.बी. पथकातील मनोज मोरे, नितीन सूर्यवंशी यांनी वलवण गावच्या हद्दीत हॉटेल सेंटर पॉईंट समोर सापळा लावून पुणे मुंबई जुना महामार्गावरून अवैध माल घेवुन जात असलेल्या वाहनाचा शोध घेवुन टेम्पो चालक जब्बी शेख ( रा . हैद्राबाद ) हा घेवुन जात असलेल्या आयषर टेम्पो नं . एमएच 11 एएल 7723 यामधुन 35,00,000 किंमतीचा गुटखा मुददेमाल जप्त केले असून सदर वाहन चालकास अटक केली आहे .