लोणावळा शहर पोलीस निरीक्षक पदी सिताराम डुबल यांची नियुक्ती..

0
245

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस निरीक्षक पदी सिताराम डुबल यांची नियुक्ती झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदाचा कार्यकाळ पार पाडून लोणावळा शहर पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार डुबल यांनी स्वीकारला आहे.

लोणावळा पर्यटन नागरिमध्ये काम करताना शहरातील वाहतूक कोंडी सारख्या महत्वाच्या समस्या सोडविणार असून पोलीस प्रशासनाकडून नागरिकांच्या असणाऱ्या समस्या आपुलकीने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे निरीक्षक डुबल यांनी सांगितले.

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक पदावर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांचे आज लोणावळा शहर पत्रकार संघाच्यावतीने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री संजय पाटील, खजिनदार रियाज शेख, पत्रकार संदीप मोरे, पत्रकार धनु रोकडे, पत्रकार श्रावणी कामत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.