लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला…

0
340

लोणावळा : वाढत्या महागाई मुळे केंद्र सरकारच्या विरोधात लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

देशभरात महागाईची झळ लागत असताना दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल चे दर आकाशाला गवस्नी घालू पाहत आहेत. अशा परिस्थितीत सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मावळचे आमदार सुनील शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मावळा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा बैलगाडी घेऊन भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रचंड उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मातीची चुल पेटवून, घोषणा बाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यां नी आपले मनोगत व्यक्त करताना सामान्य जनतेची लूट थांबवा, पेट्रोल डिझेल चे दर कमी झाले पाहिजेत अशी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष विलास बडेकर, माजी शहराध्यक्ष जिवन गायकवाड, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे,धनंजय काळोखे, जाकीर खलिफा, राजू बोराटी, महीला अध्यक्षा उमाताई मेहता, सनी पाळेकर, नारायण पाळेकर, अजिंक्य कुटे, माजी नगरसेवीका आरोही तळेगावकर, अंजना कडू, ज्ञानेश्वर कडू,संयोगिता साबळे, मंजूश्री वाघ, अमोल गायकवाड, फिरोज शेख, ताजुद्दीन शेख, सुशांत परदेशी, रिजवान शेख, राजेश तिकोणे, पूर्वा गायकवाड, जयेश देसाई, अजिंक्य टकले, आदित्य पंचमुख, गणेश इंगळे, राजेश मेहता, सुजाता जाधव, सोमनाथ गायकवाड, कैलास गायकवाड, नितेश जाधव यांसमवेत आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.