लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी विनोद होगले..

0
19

लोणावळा दि.16: लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन कार्यकारणी जाहीर लोणावळा शहर युवक अध्यक्ष पदी विनोद होगले, कार्याध्यक्ष पदी अजिंक्य कुटे, व विध्यार्थी अध्यक्ष पदी आदित्य पंचमुख तर सामाजिक न्याय विभाग मावळ तालुका कार्याध्यक्ष पदी अमोल गायकवाड आणि फिरोज शेख यांची लोणावळा शहर प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके ,राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे , युवक अध्यक्ष किशोर सातकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये खांदेपालट करत असताना मागील आठवड्यात लोणावळा शहर अध्यक्ष पदी विलासभाऊ बडेकर यांची तर कार्याध्यक्ष पदी रवीभाऊ पोटफोडे यांची निवड करण्यात आली होती.

त्यानंतर आज शहर कार्यकारणी मध्ये नव्या – जुन्या कार्यकर्त्यांची पदाधिकारी पदी वर्णी लावत पक्ष संघटना बळकट करण्याचे काम सुरू झाले असून त्यानुसार आज रोजी लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विनोद विष्णु होगले , कार्याध्यक्षपदी अजिंक्य बंडू कुटे , विद्यार्थी अध्यक्षपदी आदित्य अशोक पंचमुख यांची नियुक्ती करण्यात आली तर अमोल भरत गायकवाड यांची सामाजिक न्याय विभाग मावळ तालुका कार्याध्यक्ष पदी व फिरोज शेख यांची लोणावळा शहरप्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ही नियुक्ती पत्रके देण्यात आली आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, जिवन गायकवाड, भरत हारपुडे यांसमवेत तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार शेळके यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन नवनिर्वाचित कार्यकारणीला शुभेच्छा देण्यात आल्या.