Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा: संत रामगिरी महाराजांच्या मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाची...

लोणावळा: संत रामगिरी महाराजांच्या मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाची तीव्र नाराजी..

लोणावळा: संत रामगिरी महाराज यांनी नुकत्याच मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या व इस्लाम धर्माच्या संदर्भात अशोभनीय व अपमानजनक टिप्पण्या केल्या आहेत. त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या चरित्राबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली आहेत, ज्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत संत रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात पत्रक सादर करण्यात आले असून, भारतीय दंड संहितेच्या कलम 153A आणि 295A अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोणावळा शहरातील सुन्नी मुस्लिम जमात आणि सखल मुस्लिम समाजाने बहुसंख्येने या तक्रारीत सहभाग घेतला आहे. त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून धार्मिक शांततेला बाधा येऊ नये.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page