Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्याजवळ चिक्की च्या दुकानात आढळले भेकर, शिवदुर्गं टिम कडून रेस्क्यू…

लोणावळ्याजवळ चिक्की च्या दुकानात आढळले भेकर, शिवदुर्गं टिम कडून रेस्क्यू…

लोणावळा : एका मगनलाल चिक्की च्या दुकानात शिरलेल्या भेकराला शिवदुर्गंच्या टीम कडून वाचवून सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. ही घटना शनिवार ( दि.16 ) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास राजमाची गार्डन खंडाळा येथे घडली.
शनिवारी सकाळी राजमाची गार्डन, खंडाळा येथे मगनलाल
चिक्कीच्या दुकानात भेकर आलेला आहे असा फोन येताच सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य शुभम कुंभार, राहुल दळवी वन विभागाचे मोरे तिथे स्पॉटवर पोहोचले मगनालाल चिक्की शॉपमधून भेकरला सुखरूप रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी सर्व रेस्क्यू पथकाचे स्थानीक दुकानदार यांचेकडून आभार मानन्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page