लोणावळा (प्रतिनिधी) : मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनचा खेळाडू अतिक शेख याने 23 वर्षाखालील कॅडेट अॅण्ड सब ज्युनिअर नॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप 2023, तामिळनाडू, भारत येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून लोणावळ्याचे नव्हे तर मावळ तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.
अतिक शेख हा खेळाडू खूप मेहनती असून त्याला पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून आपल्या शहराचे व देशाचे नाव उज्वल करण्याची मनोकामना आहे. तो मास्टर विक्रम बोभाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आपली प्रगती करत आहे.
अतिक शेख याच्या कामगिरीचे लोणावळ्यातील सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी साप्ताहिक बुलंद मावळ व मावळ तालुका तायक्योंदो असोसिएशन तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.