![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणावळा शहरातील एका 26 वर्षीय तरुणास पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत एकूण नऊ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2021 साली घडली होती. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम 8, 12 आणि 9 (k) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर नंबर 105/2021 असून, सदर प्रकरणाचा सत्र न्यायालयात (सेशन केस नंबर 272/2022) तपास पार पडला.
आरोपी दीपक सुधीर मंडल (वय 26, रा. हातीगड, जि. नागाव, आसाम. सध्या राहणार साधना माल, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) याला न्यायालयाने दोषी ठरवले. मा. न्यायालयीन अधिकारी डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला.
सरकारतर्फे ॲड. अगरवाल यांनी युक्तिवाद केला. पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे प्रभारी अधिकारी होते. प्रकरणाचा तपास म. पो. उपनिरीक्षक सौ. सुरेखा शिंदे (सध्या सेवा – सोलापूर ग्रामीण) यांनी केला. कोर्टामध्ये पोलीस हवालदार एस. व्ही. माने यांनी अंमलदारी केली तर कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोसई खरात आणि जिल्हा पातळीवर पेरवी अधिकारी म्हणून पो.नि. संतोष घोळवे यांनी भूमिका पार पाडली.
न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम 354 अन्वये 5 वर्षांची शिक्षा व 1,000 रुपये दंड, POCSO कलम 12 अन्वये 3 वर्षांची शिक्षा व 1,000 रुपये दंड, तर कलम 9(k) अन्वये 5 वर्षांची शिक्षा व 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सीआरपीसी 235(2) नुसार आरोपीस दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली.