लोणावळ्यातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी कुतूबुद्दीन खान यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती…

0
1436

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचारी कुतूबुद्दीन खान यांना पोलीस दलात बढती मिळून त्यांची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कुतूबुद्दीन खान यांनी आपल्या पोलीस खात्यातील कर्तव्यातून पुणे ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, लोणावळा शहर पोलीस स्टेशन व सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन अशी कामगिरी करत असताना. त्यांनी एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणून अनेक आरोपी जेरबंद केले आहेत. त्यातच खाकी वर्दीत एक माणूस असतो हे अनेकवेळा त्यांनी पटवून दिले आहे. पोलीस असताना सुद्धा त्यांनी स्थानिकांना एक माणूस म्हणून अनेक वेळा सहकार्य केले. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल लोणावळा परिसरातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सदर पदोन्नतीबाबत त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांचे मनोगत विचारले असता “मी अनेक वर्ष प्रामाणिकपणे पोलीस खात्यात कार्य केले, तसेच अनेक वेळा माझे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी मला कर्तव्य बजावताना नेहमीच सहकार्य केले आहे. त्याचबरोबर माझी पदोन्नती ही प्रामाणिकपणे सेवा केल्याची पावती असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा उपविभाग राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि संपूर्ण लोणावळा ग्रामीण स्टाफ यांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहेत.”

तसेच कर्तव्यनिष्ठ पोलीस कुतूबुद्दीन खान यांची लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना” अष्ट दिशा “कडून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.