Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई गुटखा होलसेल व्यापाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष का...

लोणावळ्यातील किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई गुटखा होलसेल व्यापाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष का ?

लोणावळा : शहरातील किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली परंतु त्यांना होलसेल भावात गुटखा विक्रेते अद्याप मोकाटच. लोणावळा शहर पोलिसांनी गुटखा विरोधात आक्रमक भूमिका घेत दि.5 रोजी दिपक हॉटेल परिसरात कारवाई करत चार जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्या कडून एकूण 19 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


शहरातील किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत लोणावळा शहर पोलिसांनी आरोपी – वसंत किसन घनवट (वय 34, रा. औंढे ),अनिध श्रीधर हेगडे (वय 32, रा. निसर्गनगरी लोणावळा), निलेष सुरेष रगडे (वय 42, रा. गवळीवाडा लोणावळा ) व यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान (वय 24, रा. गवळीवाडा लोणावळा ) या चौघांजवळ एकूण 19 हजार रुपये किमतीचा विषारी गुटखा मिळून आल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

त्यासंदर्भात हनुमंत वामनराव शिंदे ( पोलीस कॉन्स्टेबल लोणावळा शहर पोलीस स्टेशन ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादेवरून चारही आरोपिंच्या विरोधात भाग 5 गुन्हा र. नं.104/2021 भा. द. वी.कलम 328,34 अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत नियम ब 2011 चे कलम 26/2/27 सह वाचन कलम (30/21,101)59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.


पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात असून पोलीस ह्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करत आहेत मग ह्या किरकोळ विक्रेत्यांना गुटखा पूरवीणाऱ्या मोठया होलसेल व्यापाऱ्यांवर कारवाई का करत नाही अशी चर्चा शहरात सुरु आहे.


राज्यात गुटखा बंदी असताना शहरात गुटखा कसा येतो याकडे प्रशासनाने लक्ष घालावे तसेच शहरातील प्रत्येक टपरी व दुकानात अगदी सहजपणे मिळणारा गुटखा हे किरकोळ विक्रेते आणतात कुठून याकडेही लक्ष घालणे तेवढेच गरजेचे आहे. ह्या होलसेल गुटखा व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तर शहरात गुटखा येणे कायमस्वरूपी बंद होईल व शहर गुटखा मुक्त होईल अशी चर्चा शहरातील व्यापारी वर्गामध्ये चर्चा सुरु आहे.

- Advertisment -