Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील पान टपऱ्यांवर छापा: प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचे मोठे साठा जप्त..

लोणावळ्यातील पान टपऱ्यांवर छापा: प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचे मोठे साठा जप्त..

लोणावळा:(श्रावणी कामत)लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्यांनी आपल्या पोलीस अधिकारीसह लोणावळा शहरातील विविध पान टपऱ्यांवर छापा टाकला.
यामध्ये एकूण १,०८,७७२/- रुपयांचा सुगंधित तंबाखुजन्य गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. रवि शंकर बुगडे (वय २४)अतुल बळीराम लोखंडे (वय ४२) कृष्णा संदीप गवळी (वय १९) शोयब नईम खान (वय २५) मनोजकुमार महावीर प्रसाद भारव्दाज (वय ३०) उमर मोहमद एम.बी. (वय ४८) मोहम्मद एकलास खान (वय ३४) संजय कान्हु सोनवणे (वय ६०) अशोक गुंडू पुजारी (वय ५६) शकील अख्तर रईससुद्दीन शेख (वय १९) मोहम्मद हसिब शरीफ मन्सुरी (वय ३८) यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान (वय २७) अब्दुल रहिमान इब्राहिम (वय ३५) वसुद्दीन सिराजउद्दीन खान (वय ३६) यांना अटक करुन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर पोलीसांनी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page