Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यातील फारुख बागवान यास पोर्तुगाल येथील जागतिक "प्रेसिडेंट क्लब अवॉर्ड 2023"प्रदान…

लोणावळ्यातील फारुख बागवान यास पोर्तुगाल येथील जागतिक “प्रेसिडेंट क्लब अवॉर्ड 2023″प्रदान…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील तरुणाची नोकरीतून उथुंग भरारी.Bergisch Gladbach जर्मनी येथील मिलटेनी बायोटेक कंपनीत काम करताना पोर्तुगाल येथे “प्रेसिडेंट क्लब अवॉर्ड”प्राप्त करून विश्वात भारताचे नाव लौकिक केले आहे.
मिलटेनी बायोटेक बायोमेडिकल उत्पादनांच्या निर्मितीमध्ये काम करणारी ही जर्मनीमधील प्रमुख बायोटेक्नॉलॉजी कंपनी आहे. Bergisch Gladbach जर्मनी कंपनीच्या वतीने पोर्तुगालमध्ये 14 फेब्रुवारी 2023 रोजी तिवोली मरीना हॉटेलमध्ये हा जागतिक पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात जगभरातून सुमारे 650 लोक सहभागी झाले त्यापैकी भारतातून 3 जण सहभागी होते.यावेळी Bergisch Gladbach जर्मनी कंपनीकडून बायोटेक कंपनीत 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी “प्रेसिडेंट क्लब अवॉर्ड 2023” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर लोणावळ्यातील गावठाण येथे राहणारा फारुख रफिक बागवान या तरुणाला “प्रेसिडेंट क्लब अवॉर्ड 2023” हा जागतिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फारुख यांनी आपली मेहनत आणि जिद्दीने उत्कृष्ट कामगिरी करत या कंपनीतील 2023 मधील उत्कृष्ट इंजिनिअर म्हणून हा मान मिळविला. परदेशात पुरस्कार प्राप्त करून फारुख यांनी खरोखरच अभिमानास्पद कार्य करून भारत देशासह लोणावळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
फारुख हा खेळाडू वृत्तीचा तरुण असून लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात क्रिकेट क्षेत्रात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वर्ष क्रिकेट क्षेत्रात उत्कृष्ट बल्लेबाज व उत्कृष्ट खेळाडू अशी आपली कारकीर्द निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या मिलटेनी बायोटेक कंपनीत उत्कृष्ठ इंजिनिअर म्हणून मान मिळविला.या अनुषंगाने Bergisch Gladbach जर्मनी या बायोटेकनॉलॉजि कंपनी आयोजित पोर्तुगाल येथील सन्मान सोहळ्यात भारतातील तीन सदस्यांपैकी फारुख याला “प्रेसिडेंट क्लब अवॉर्ड 2023” प्रदान करण्यात आला.
यावेळी जगभरातून आलेल्या अनेक सदस्यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.फारुख यांना परदेशात मिळालेल्या अवॉर्ड बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अशा तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.कारण आपल्या कार्यातून जागतिक पातळीवर स्वतःचे व आपल्या देशाचे नाव लौकिक करू शकतात.

You cannot copy content of this page