लोणावळा (प्रतिनिधी):मावळ वार्ता फाउंडेशन सर्व राजकीय पक्ष व संघटना लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित मानाची यावर्षीची दहीहंडी गवळीवाडा येथील गोविंदा पथकाने फोडली.
आयोजकांकडून यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवासाठी 7,77, 777/- रुपयांची सामायिक बक्षिसे ठेवण्यात आली होती. लोणावळा शहर दहीहंडी महोत्सवाचे अध्यक्ष हेमंत सतीश मुळे, मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार वाळुंज यांच्यासह फाउंडेशनचे सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रथम हंडी चे पूजन करत दहीहंडी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यसनमुक्ती या विषयावर पुणे थिएटर च्या कलाकारांनी पथनाट्य सादर करत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह विविध मान्यवरांनी या ठिकाणी सदिच्छा भेट देत आयोजक व गोविंदा पथक यांचा उत्साह वाढवला.
लोणावळा शहर दहीहंडी महोत्सवाची मानाची हंडी गवळीवाडा गोविंदा पथकाने फोडली.तर दुसऱ्यांदा लॉट्स पाडत उर्वरित संघांना संधी देण्यात आली त्यामध्ये इंदिरानगर संघाने ही दुसरी हंडी सहा थर रचत फोडली.