Friday, June 9, 2023
Homeक्राईमलोणावळ्यात अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला,तीन अल्पवयीन मुलांना अटक…

लोणावळ्यात अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला,तीन अल्पवयीन मुलांना अटक…

लोणावळा (प्रतिनिधी):एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांवर तीन अन्य अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्र व फायटर च्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दि.24 रोजी घडला.या मारहाणीत सदर शालेय विद्यार्थी गंभिर जखमी झाला असून याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
अकिब अमिर शेख (वय 16, रा. गणपती चौक कामशेत) असे या हल्ल्यात गंभिर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने स्वतःच या घटनेची फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरगाव भागात राहणारी दोन 15 वर्षाची मुले व आगवाला चाळ येथे राहणारा एक 16 वर्षाचा मुलगा या तीघांनी शुक्रवार दि.24 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अकिब शेखवर जीवघेणा हल्ला करत त्याला जखमी केले. गवळीवाडा येथील व्हिपीएस शाळेच्या जवळील रस्त्यावर वरील तीघांनी शेख याला पकडत त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला व फायटरने डोक्यात मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या मारहाणीतून शेख हा वाचला आहे. वरील तीघांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ते तीघेही अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करत आहेत.

You cannot copy content of this page