लोणावळा (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रमजान महिन्याचे औचित्य साधत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अल्पसंख्याक सेलच्या वतीने रमजान महिन्याचे औचित्य साधत इंदिरानगर, तुंगार्ली येथे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अमीर मुलाणी, बाळासाहेब पायगुडे, शहराध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सईद खान, कार्याध्यक्ष आदिल बंगाली, मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिफा, पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, रज्जाक पठाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार शेळके यांनी रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना आमदार शेळके म्हणाले, समाजात सर्वधर्म समभाव राहिला पाहिजे. समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा शांतता नांदण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. तसेच लोणावळा शहरप्रवक्ता फिरोज शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.