लोणावळ्यात ईद व अक्षय तृतीया सणाच्या पाश्वभूमीवर पोलिसांचे शक्ती प्रदर्शन…

0
572

लोणावळा दि.27 : – मावळ पोलीस ठाणे हद्दीतील लोणावळा शहरात आज सायंकाळी रमजान ईद अक्षय तृतीय सणाच्या अनुषंगाने शांतता अबाधित राहणे करीता लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे रूट मार्च शक्तिप्रदर्शन घेण्यात आले .

रूट मार्च नंतर शिवाजी महाराज चौक येथे दंगा काबू योजना म्हणजेच राईट स्कीम सराव घेण्यात आला . सदर रूट मार्च उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील , लोणावळा विभाग लोणावळा यांचे मार्गदर्शनखाली , डिव्हिजन मधून 4 पो.नि , 5 सपोनि / पोसई , 40 पोलीस अंमलदार , 11 होमगार्ड , 5 वॉर्डन या रुट मार्च परेड ला हजर होते.

लोणावळा शहरात रूट मार्च हा येथील शिवाजी महाराज चौक- मिनारा मशीद गावठाण – भैरवनाथ मंदिर – मेमन मशीद – जयचंद चौक- शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली . अशी माहिती लोणावळा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डूबल यांनी दिली .