Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून...

लोणावळ्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून फरार…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बाईकस्वार चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दुपारी 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास खंडाळा व वलवण भागात घडली.
खंडाळा व वलवण दोन्ही ठिकाणी दुचाकी गाडीवरुन आलेल्या अनोळखी इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेले आहेत.
पहिल्या घटनेबाबत सुशिला बाळू भगत (वय 60 वर्ष, रा. वलवण लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भगत या दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वलवण गावच्या हद्दीत हिंदुस्तान हार्डवेअरच्या पुढे गेल्यानंतर उजवे बाजुला असणाऱ्या रस्त्यावरून जात असताना समोरुन अचानक दोन अनोळखी इसम काळ्या रंगाची मोटारसायकलवर येवून फिर्यादी च्या गळयातील 2 तोळे 06 ग्रॅम वजनाचे 95,000 रु. किंमतीची सोन्याची दोन पदरी माळ हिसकावून चोरी करुन पळाले.
तर दुसरी घटना ही खंडाळा बॅटरी हिल परिसरात घडली. ड्युक्स हॉटेल समोर पेरु विकणाऱ्या सविता रविंद्र पोशिरे (वय 24 वर्ष, रा बॅटरीहिल खंडाळा) यांच्या फिर्यादी नुसार पोशिरे यांच्या पेरूच्या गाडी जवळ दुचाकी गाडीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचा 90,000 रु. किमतीचा मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. एकाच दिवशी भर दिवसा चोरीच्या या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे.
या दोन्ही घटनांप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोवार व पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे पुढील तपास करत आहेत.दरम्यान दोन्ही घटनांच्या परिसरातील तसेच हायवेवरील सिसीटिव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरु आहे.

You cannot copy content of this page