Sunday, September 24, 2023
Homeक्राईमलोणावळ्यात क्रिकेट सट्टाबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक !

लोणावळ्यात क्रिकेट सट्टाबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक !

लोणावळा : लोणावळा परिसरात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतले ताब्यात.

या कारवाईत 53 हजारांची रोकड , सहा मोबाइल संच , लॅपटॉप , टॅब असा 2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी अजय नटवरलाल मिठिया ( वय 47 ) , रवी रसिकभाई रजाणी ( वय 26 ) , निपुल देवासीभाई पटेल ( वय 28 ) , जिग्नेश गणेशभाई रामाणी ( वय 32 ) , मितेश रमेशभाई सिंधू ( वय 27 , रा . सर्व रा . राजकोट , गुजरात ) यांना अटक करण्यात आली आहे .

लोणावळ्या जवळील आपटे गावातील लेक मॅन्शन बंगल्यात भारत विरुद्ध – इंग्लड दरम्यान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली होती . त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच सट्टेबाजांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून रोकड , मोबाइल संच , टॅब , लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे , लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले , गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके , सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे , शब्बीर पठाण , तुषार पंधारे , विक्रम तापकीर , चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -