Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात छटी शरीफ च्या निमित्ताने एकोप्याचे दर्शन, सर्व धर्मियांनी दिल्या मुस्लिम बांधवांना...

लोणावळ्यात छटी शरीफ च्या निमित्ताने एकोप्याचे दर्शन, सर्व धर्मियांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा…

लोणावळा (प्रतिनिधी):हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेर शरीफच्या 811 व्या उर्स निमित्त मुस्लिम बांधवांकडून छटी शरीफ चे आयोजन रविवार दि. 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 यावेळेत टेबल लँड जी-वॉर्ड लोणावळा येथे करण्यात आले.लोणावळ्यातील एन.एम. एम.एम. ग्रुप टेबल लँड व लोणावळा सोशल फौंडेशन यांच्या वतीने उर्स निमित्त प्रसादाचे आयोजन करण्यात आले.यावेळी लोणावळा परिसरातील विविध पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
सर्व उपस्थित मान्यवरांना लोणावळा फौंडेशन चे जिशान भाई शेख,फरान भाई शेख,आलिम शेख,इम्रान तांबोळी, सुरज मुजावर, अनिस तांबोळी,झाईद सय्यद, वसीम शेख, नवाज शेख आदी सदस्यांनी शाल देऊन मान्यवरांचे स्वागत केले .तर एन. एम. एम. एम. ग्रुप टेबल लँड जि वार्ड चे तौफिक आत्तार,नवाज शेख, जमीर शेख,फरीदअत्तार, मोहसीन अत्तार,साकिब अत्तार, फैज अत्तार, नसीर कुरेशी , हनीफ शेख,कैलास कांबळे , अयुब शेख,मन्सूर इनामदार , अक्षय नायर,तक्कू शेख ,आबिद शेख,शकील शेख आणि जुबेर कुरेशी आदी सदस्यांनी प्रसादाचे वाटप केले.
तसेच सुन्नी मुस्लिम जमातचे ट्रस्टी शफी अत्तार, हाजी पटेल,रफिक शेख आदींनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,मावळ वार्ताचे संजय अडसूळे,माजी शिक्षण सभापती जितुभाई कल्याणजी, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, ब्रिंदा गणात्रा, लोणावळा शहर राष्ट्रवादी महिलाध्यक्षा उमा मेहता, आशिष बुटाला, सईद खान (कॉन्ट्रॅक्टर), प्रदीप थत्ते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास खंडेलवाल,जीवन गायकवाड, रवी पोटफोडे, विनोद होगले,पूजा गायकवाड, आरोही तळेगावकर,राजेश मेहता,राजू बोराटी, नंदकुमार वाळंज (बाबूजी), काँग्रेस प्रदेश सचिव निखिल कवीश्वर,प्रमोद गायकवाड,भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, शिवसेना शाखा प्रमुख बाळासाहेब फाटक यांसह अन्य मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घेतला तसेच हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेर शरीफ च्या 811 व्या (जयंती) उर्स निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page