लोणावळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सात दिवस कार्यक्रमांचे आयोजन…

0
63

लोणावळा : महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौध्द महासभा व बौध्दजन हितकारणी सभा ट्रस्ट च्या वतीने लोणावळ्यात सलग सात दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त 131 दुचाकी,131 तीन चाकी व 131 चार चाकी वाहनाच्या भव्य रॅलीचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर बंगला तळेगाव ते लोणावळा असे करण्यात आले, शालेय विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

14 एप्रिल रोजी सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशा, साऊंड च्या गजरात हजारो भीम सैनिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयोजकांकडून भव्य दिव्य मिरवणुकीत फुलांची उधळण करून व फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करून उत्साही वातावरणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.