Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात नगरपरिषदेने झेंडे व फ्लेक्स हटवले…

लोणावळ्यात नगरपरिषदेने झेंडे व फ्लेक्स हटवले…

लोणावळा : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद हद्दीतील 350 फ्लेक्स व 150 झेंडे काढण्यात आले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च रोजी लागू झाली.त्यानंतर पुढील 24 तास, 48 तास, 72 तास असे टप्पे करत लोणावळा शहरातील विविध चौकांमध्ये तसेच रस्त्यांच्या कडेला लावण्यात आलेले जवळपास 350 फ्लेक्स लोणावळा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून उतरवण्यात आले आहेत. तसेच विविध ठिकाणचे जवळपास 150 झेंडे हे देखील काढण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्षांचे फलक तसेच शासकीय इमारतीवरील उद्घाटन, भूमिपूजनाच्या पाट्या
झाकण्यात आल्या आहेत.
मावळ प्रांत अधिकारी हे निवडणुकीचे कामकाज पाहत असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स विनापरवाना शहरात लावू नये असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च रोजी पासून लागली असून 13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी, राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटना यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे.
आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणीही विनापरवाना कुठेही फ्लेक्स लावू नये, झेंडे लावू नयेत तसेच सोशल मीडियावर लोणावळा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च रोजी लागू झाली.त्यानंतर पुढील 24 तास, 48 तास, 72 तास असे टप्पे करत लोणावळा शहरातील विविध चौकांमध्ये तसेच रस्त्यांच्या कडेला लावण्यात आलेले जवळपास 350 फ्लेक्स लोणावळा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून उतरवण्यात आले आहेत. तसेच विविध ठिकाणचे जवळपास दीडशे झेंडे हे देखील काढण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्षांचे फलक तसेच शासकीय इमारतीवरील उद्घाटन, भूमिपूजनाच्या पाट्या झाकण्यात आल्या आहेत.
मावळ प्रांत अधिकारी हे निवडणुकीचे कामकाज पाहत असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स विनापरवाना शहरात लावू नये असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च रोजी लागली असून 13 मे रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी, राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटना यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे.
आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणीही विनापरवाना कुठेही फ्लेक्स लावू नये, झेंडे लावू नयेत तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या भडकाऊ प्रतिक्रिया टाकू नयेत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करू नयेत. ज्या कार्यक्रमासाठी फ्लेक्स बोर्ड लावायचा आहे, त्यावर छापण्यात येणारा मजकूर हा लोणावळा नगरपरिषदेमधून तपासून घेऊनच तो पुढे परवानगीसाठी पाठविला जाणार आहे. मावळ उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांची परवानगी घेऊनच सदरचे परवाने दिले जाणार असल्याचे अशोक साबळे यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page