लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी…शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी परिस्थिती !

0
367

लोणावळा : लांबणीवर गेलेल्या पावसाने अखेर आज लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले. आज सकाळ पासून उकाडा भासत असताना सायंकाळी 3:45 च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली अगदी पंधरा ते वीस मिनिटे सातत्याने कोसळत पावसाने दमदार हजेरी लावली.

अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत एकदम शुकशुकाट झाला. पावसाचे पाणी रस्त्यावर भरून वाहत होते, सर्वत्र थंडगार वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने जरी लोकांची तारांबळ झाली असली तरी पावसाने लोणावळेकर सुखावला असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोणावळा खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावत मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली . अचानक आलेल्या पावसामुळे शुक्रवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी व विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांची देखील तारांबळ उडाली.