लोणावळ्यात बाहेरील भाजी व फळे विक्रेत्यांवर कारवाई करा,हिंदू समितीची मागणी..

0
969

लोणावळा : लोणावळा शहरात बाहेरील भाजी वाले व फळ विक्रेते वाढले असून त्यांच्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये याची वेळीच दक्षता घेण्यात यावी असे निवेदन हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसराच्या वतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

लोणावळा शहरात शहराच्या बाहेरून येणाऱ्या फळ व भाजीपाला व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरात शहराच्या बाहेरील काही फिरते व्यावसायिक टैम्पो लावून भाजीपाला व फळे विक्री करत आहेत . यामुळे स्थानिक भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या व्यापारावर परिणाम झाला आहे . याशिवाय या व्यापाऱ्यांकडे ओळखीचा कोणताही पुरावा उपलब्ध नसतो अथवा ते दाखवत नाहीत . यामुळे त्यांच्यावर संशय येतो . याकारणामुळे शहराच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो .

भविष्यात यांच्याकडून चोरी मारी यासारखे गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या बाहेरील फेरीवाल्यांमध्ये व स्थानिक भाजी आणि फळ विक्रेत्यांमध्ये वारंवार संघर्ष होताना दिसतो . यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो . त्यामुळे लोणावळा शहर पोलीस निरीक्षकांनी याकडे लक्ष घालून याबाबतीत वेळीच योग्य ती कारवाई करावी .असे लेखी निवेदन हिंदू समितीच्या वतीने देण्यात आले आहे.

यावेळी डॉ किरण गायकवाड, भारत चिकणे, सुनील गायकवाड, जितुभाई कल्याणजी, आनंद गावडे, विश्वनाथ पुट्टोल, रवींद्र सुतार, नरेश घोलप यांसमवेत सर्व समिती सदस्य व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.