लोणावळ्यात बेधडक गुटखा विक्री सुरू..या गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद ?

0
773

लोणावळा : महिना भर विश्रांती नंतर शहरात पुन्हा विषारी गुटखा विक्री खुलेआम सुरु.गुटखा माफियांना पोलीस प्रशासनाची भीती राहिली नसल्याचे चित्र लोणावळा शहरात दिसत आहे.

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलीसांनी गुटखा विक्रेत्यांच्या विरोधात आक्रमक होऊन अनेक गुटखा विक्रेत्यांना ताब्यात घेऊन गुटखा हस्तगत केला होता. लोणावळा पोलिसांची गुटखा विरोधातील दमदार कारवाई पाहून आपले शहर गुटखा मुक्त होणार याचे समाधान मानत अनेक नागरिकांकडून पोलीस कारवाईचे कौतुकही करण्यात आले होते. त्यातच पोलिसांनी किरकोळ गुटखा विक्रेत्यांबरोबर त्यांना गुटखा पुरविणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवरही कारवाई का केली नाही असा प्रश्न निर्माण झाला असून.

पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईला महिना ही उलटला नाही तर पुन्हा शहरात गुटखा विक्रीची सुरुवात झाली आहे. यातून असे दिसून येते की या गुटखा माफियांवर पोलिस प्रशासनाची वचक राहिलेली नाही अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

किरकोळ गुटखा विक्रेत्यांवरच पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असून याचा मुख्य गुटखा माफियांवर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही.लोणावळा शहर व ग्रामीण भागातील काही होलसेल व्यापारी विषारी गुटका खुलेआम विकत असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

या गुटख्यात तंबाखू मिश्रित सुगंधी सुपारी,स्वीयिंग सेंटेंड सुपारी,बनारस सेंटेंड सुपारी तसेच ग्लिसरीन,क्विविम आणि पॅरॅफिन असे विषारी साहित्य मिक्स केले जातात.त्यामुळे हे खाणाऱ्या व्यक्तीला कँसर , नपुन्सक्ता , तोंडाचे,घशाचे,पोटाचे भयंकर विकार , नैराश्य , दुर्बलता अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे याने तरुणपिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

याप्रकरणी बाजारपेठेत या विषारी गुटख्याची विक्री करणाऱ्या होलसेल दुकानदारांच्या विरोधात पोलीस प्रशासन ठोस पावले उचलतील का? याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, लोणावळा शहर पोलीस, ग्रामीण पोलीस व स्थानिक पालिका प्रशासन यांच्याकडून काही प्रशासकीय कारवाई करण्यात येईल का? आपले शहर गुटखा मुक्त होईल का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी वरिष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.