Friday, June 2, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात भाजपा व महागाईच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन...

लोणावळ्यात भाजपा व महागाईच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन…

लोणावळा : भाजपा सरकारची कटकारस्थाने व वाढती महागाई आणि इडीची कारवाई याच्या विरोधात आज लोणावळा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त करताना संताप व्यक्त केला.

देशात महागाई व बेरोजगारी वाढत असताना त्याविरोधात शब्द न काढणारे केंद्र सरकार व भाजपा , महाविकास आघाडी नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत नेत्यांच्या व मंत्र्यांच्या घरांवर ईडीच्या धाडी घालण्याचे निच राजकारण करत असल्याची टिका या आंदोलनात करण्यात आली .

यावेळी शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर , लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , लोणावळा शहर काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कविश्वर , राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे , राजु बोराटी , रवी पोटफोडे , जितेंद्र कल्याणजी , नासिर शेख , सुबोध खंडेलवाल , राजेश मेहता , सनी पाळेकर , शाम सुतार , संजय भोईर , फिरोज बागवान , संतोष कचरे , मनिषा भांगरे , सिंधू परदेशी , उमा मेहता , संयोगिता साबळे , अजिंक्य कुटे , शिवदास पिल्ले , बाबुभाई शेख , फिरोज (बंगाली) शेख, मारुती राक्षे , ज्ञानेश्वर येवले , जयवंत दळवी , विशाल हुलावळे यांच्यासह काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You cannot copy content of this page