लोणावळ्यात महामार्गावर फक्त पांढऱ्या पट्ट्या रेखाटल्याने अपघाताची मालिका थांबणार का ?

0
232

लोणावळा : महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लोणावळा महामार्गावर उपाय योजना कराव्यात इत्यादी मांगण्यांसाठी समस्त लोणावळेकरांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. पर्यायी महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी आज एम एसआरडीसी प्रशासनाने कोटक महिंद्रा बँकेसमोर महामार्गावर पांढऱ्या पट्ट्या मारण्याचे काम सुरु केले आहे.

काय या पट्ट्या महामार्गावर रेखाटल्याने वाहनांचा वेग कमी होणार का? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनशक्ती केंद्र वरसोली ते आर पी टी एस खंडाळा या भागात अनेक ठिकाणी एमएसआरडीसी ने पांढऱ्या पट्ट्या रेखाटल्या आहेत परंतु वाहनांचा वेग कमी करण्यासाठी याचा काही प्रभाव होत नसल्याचे दिसून येत आहे.

आंदोलनात करण्यात आलेल्या विविध मागण्यानुसार अजून महत्वाच्या कोणत्याच हालचाली रस्ते विकास महामंडळाकडून सुरु केल्याचे दिसत नाही,तर रेखाटले जातात फक्त हे पांढरे पट्टे याचा प्रभाव फक्त रिक्षा, दुचाकी व स्थानिक वाहनांचा वेग कमी होत आहे परंतु महामार्गावरून वेगात येणाऱ्या मोठी वाहने तसेच चार चाकी वाहनांच्या वेगाला काहीच फरक पडत नसून या पांढऱ्या पट्ट्या वरूनही ही वाहने सुसाट धावत असल्याचे दिसत आहे.

मग अशा परिस्थितीत हे अपघाताचे सत्र थांबणार का? तसेच एमएसआरडीसी प्रशासन अशा उपाय योजना करून सर्व आंदोलकांची समजूत काढत असल्याचे काम करत आहे असा समज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.कधी होणार मुख्य मागण्या पूर्ण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.