लोणावळ्यात मातंग समाजाने नोंदविला केंद्र सरकार निर्णयाचा निषेध…

0
103

लोणावळा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महापुरुषांच्या यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहर मातंग समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारच्या अख्त्यारीत डॉ. बाबासाहेब फौंडेशन येथील महापुरुषांच्या यादीमध्ये जगविख्यात साहित्यिक, समाज सुधारक, प्रबोधनकार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना स्थान देण्यास नाकारत त्यांना या यादीतून वगळले असल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ लोणावळा शहर सकल मातंग समाजाच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केंद्र सरकार व संबंधित फौंडेशन अधिकारी यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणा बाजी करत निषेध करण्यात आला.

यावेळी लोणावळा शहर मातंग समाज अध्यक्ष सोमनाथ बोभाटे, उपाध्यक्ष विकास साठे, कार्याध्यक्ष प्रशांत खवळे, उप कार्याध्यक्ष विजय साबळे, विनोद साबळे, खजिनदार उदय बोभाटे, उपसेक्रेटरी अभय लोंढे, जेष्ठ कार्यकर्ते अशोक बोभाटे यांसमवेत सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.