Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात मी सावरकर ही गौरव यात्रा संपन्न,भाजपा कार्यकर्ते व सावरकर वादी नागरिकांचा...

लोणावळ्यात मी सावरकर ही गौरव यात्रा संपन्न,भाजपा कार्यकर्ते व सावरकर वादी नागरिकांचा मोठा सहभाग…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर भाजपाच्या वतीने “मी सावरकर या गौरव यात्रेचे” आयोजन करण्यात आले.
यावेळी भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्षा व माजी आमदार मेधा कुलकर्णी या उपस्थित होत्या.त्यांच्या उपस्थितीमध्ये या गौरव यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वा. सावरकर चौक भांगरवाडी दरम्यान ही गौरव यात्रा काढण्यात आली.लोणावळा शहर व परिसरातील सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने या गौरव यात्रेत सहभागी झाले होते. मी सावरकर, तुम्ही पण सावरकर, आपण सर्व सावरकर अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने स्वा. सावरकर यांच्याविषयी अपशब्द काढत आहेत.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून देणाऱ्या या राष्ट्र भक्तांचा अपमान हिंदू कधीच सहन करणार नाही. राहुल गांधी यांना नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा आपण माफी मागणार का यावर बोलताना राहुल गांधी यांनी मी काही सावरकर नाही अशा शब्दात स्वा. सावकरांचा अपमान करत खिल्ली उडवली होती. तेव्हा पासून देशभरात स्वा. सावरकरांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. जवळपास पाचशे ठिकाणी अशा गौरव यात्रा निघाल्या आहेत.
लोणावळ्यातील भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, गटनेते देविदास कडू, माजी सभापती ब्रिंदा गणात्रा, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, ललित सिसोदिया, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सायली बोत्रे, शहराध्यक्षा योगिता कोकरे, अरविंद कुलकर्णी, राजाभाऊ खळदकर, शुभम मानकामे, अरुण लाड, समिर इंगळे, सुधिर राईलकर, आशिष बुटाला, हर्षल होगले, सुनिल तावरे, परिजा भिल्लारे, अन्वर निंबर्गी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व सावरकर वादी नागरिक मोठ्या संख्येने या गौरव यात्रेत सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page