लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर शिवसेनेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महा परिनिर्वाण दिना निमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्रस्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, संजय भोईर, जयवंत दळवी यांसमवेत शिव सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.