Monday, July 22, 2024
Homeक्राईमलोणावळ्यात सहारा ब्रिज बनलाय चोरट्यांचा अड्डा, चोरट्यांचा कसोशीने शोध घेण्याची गरज !

लोणावळ्यात सहारा ब्रिज बनलाय चोरट्यांचा अड्डा, चोरट्यांचा कसोशीने शोध घेण्याची गरज !

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यात फिरायला आलेल्या पर्यटक तरुणांना धारदार चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवून जबरदस्ती लुटल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि.17 रोजी सायंकाळी 5:45 वा. च्या सुमारास सहारा ब्रिज जवळील डोंगरावर घडला आहे. याप्रकरणी कु. सत्यम रामप्रकाश चौरसिया (वय 26, रा. राठी बी. बिल्डिंग, सेक्टर 04, उलवे, नवी मुंबई, सागर शाळेजवळ,शंकर कॉलनी,न्यू बस स्टॉप, अशोक नगर) याने लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी गु.र.क्र.383/23 भादवी कलम 394,34 प्रमाणे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1) इम्रान सिद्दिीकी 2) समीर अख्तर,3)पृथ्वीराज सिंग व 4)सत्यम चौरसिया अशी चोरट्यांनी लुटलेल्या पर्यटक तरुणांची नावे आहेत.यामधील इम्रान सिद्धीकी व समीर अख्तर हे दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार चारही फिर्यादी हे लोणावळ्यातील सहारा ब्रीज जवळ,डोंगरावर,दि.17 रोजी 05.45 वा चे सुमारास बसले असता तीन अनोळखी इसम चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवून व दांडक्याने मारहाण करून फिर्यादी जवळील 10,000/- रूपये किंमतीचा एक मोटोरोला कंपनीचा MOTO G8 वापरता मोबाईल फोन त्यात दोन सीमकार्ड व पृथ्वीराज सिंग याचेकडील 10,000/- रूपये किंमतीचा ONE PLUS NORD CE 3 – 5G मोबाईल फोन त्यात सीमकार्ड,एक लहान बॅग त्यामध्ये चार्जर व कपडे, इमरान याचेकडील 10,000/- रूपये किंमतीचा रिअलमी C.35 मॉडेलचा जुना वापरता मोबाईल व सीम कार्ड तसेच समीर याचेकडील 5,000/- रुपये किंमतीचा रेडमी 91 मोडेलचा जुना वापरता मोबाईल व सीम कार्ड आणि 6,000/- रूपये किंमतीचा रिअलमी CY 21 मोडेलचा मोबाईल त्यात सीम कार्ड,आणि 1,000/- रोख रक्कम एकूण अंदाजे रक्कम 40,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल व अंगावरील कपडे चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. सदर फिर्यादेवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पोवार हे पुढील तपास करत आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी लोणावळ्यातील एक तरुण व त्याच्या मैत्रीणी सोबत असाच प्रकार घडला होता. तेव्हा मात्र त्या दोघांनी कसोशीने विरोध केला असता ते बचावले होते.या घटनेला काही महिने उलटले असता सोमवारी पुन्हा त्याच ठिकाणी तसाच प्रकार घडला आहे.त्यामुळे आता सहारा ब्रिज हे पर्यटन स्थळ मात्र धोकादायक बनत चालले आहे. लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्यात येत असतात.त्यासाठी पोलिसांनी या गुन्हेगारांचा शोध घेऊन लवकरात लवकर अटक करावी अन्यथा याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते.
- Advertisment -

You cannot copy content of this page