Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळावंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक लोणावळा तर्फे ऊबदार...

वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक लोणावळा तर्फे ऊबदार ब्लॅंकेटचे वाटप…

लोणावळा (प्रतिनिधी): विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक लोणावळा शहर यांच्या तर्फे ऊबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक लोणावळा शहरच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे या वर्षी ही दि.5 डिसेंबर आणि दि.6 डिसेंबर रोजी बाजारपेठ, रेल्वे स्टेशन वरील मोलमजुरी व कष्टकरी वर्गाला तसेच अनाथ आश्रमातील मुलांना उबदार चादरी वाटप करण्यात आल्या.
त्याचबरोबर आज सायंकाळी लोणावळा शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलित करून सामुहीक वंदना घेत अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण रोकडे,रोहन कांबळे, रोहन गायकवाड, मिलिंद गायकवाड,अतुल उघडे, मोहन नाईक, रोहित जाधव, संजय कांबळे, विशाल कांबळे,अमित देसाई, हरीश वाघमारे, मुरली सरोदे,महेश जाधव, दिनेश वाघमारे, मिलिंद देसाई,अनुज सरवते,मोहन नाईक यांसमवेत वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page