Friday, June 9, 2023
Homeपुणेवडगाववडगांव जवळ पुन्हा दुचाकी व टेम्पोच्या अपघातात 4 वर्षीय बालकास गमवावा लागला...

वडगांव जवळ पुन्हा दुचाकी व टेम्पोच्या अपघातात 4 वर्षीय बालकास गमवावा लागला जीव…

मुंबई पुणे महामार्गावर
अपघातांचे मालिका सुरूच…

मावळ (प्रतिनिधी): मुंबई पुणे महामार्गावर वडगांव हद्दीत दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर असलेल्या चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण मावळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर खळबळ जनक अपघात बुधवार दि.22 रोजी दुपारी 3:15 वा.च्या सुमारास घडला.ट्रकने दुचाकीला चिरडल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या अपघाताने महामार्गावर दोन तास वाहतूक कोंडी झाली.
कार्तिक ज्ञानेश्वर सुतार (वय 4 वर्ष,रा. कान्हे फाटा, ता. मावळ,मूळ गारवडी ता.खटाव जि.सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे तर ज्ञानेश्वर चिंतामण सुतार (वय 28 ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
वडगांव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर सुतार व त्यांचा मुलगा कार्तिक हे त्यांच्या MH 12 ER 9852 दुचाकीवरून कान्हेफाटा येथून सोमाटणे बाजूला चालले होते, त्यावेळी वडगाव – तळेगाव दाभाडे फाटा येथे त्यांच्या दुचाकीला MH 13 DQ 2933 क्रमांकाच्या ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात कार्तिक ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर सुतार यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे.

या अपघातामुळे चौकात दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर दुतर्फा लांबलचक रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून जखमीला सोमाटणे येथील बडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page