Friday, June 9, 2023
Homeपुणेवडगाववडगांव नगरपंचायत कडून पावसाळ्यापूर्वीच्या नाले गटर साफसफाई कामास सुरुवात…

वडगांव नगरपंचायत कडून पावसाळ्यापूर्वीच्या नाले गटर साफसफाई कामास सुरुवात…

मावळ (प्रतिनिधी):वडगाव नगरपंचायतच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे – नाले साफसफाई कामास सुरुवात करण्यात आली आहे.येत्या जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व ओढे-नाले साफसफाईच्या सर्व कामांना दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यात आली असता यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी नाले साफसफाई कामांची पाहणी केली.
तसेच वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील काही उघडी गटारे साफ करणे, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यासंदर्भात नगरपंचायत मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सूचना दिल्या आहेत.
शहरातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होऊ नये. यासाठी मुख्य बाजारपेठेसह व अन्य भागात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येणार असून जेणेकरुन कोणताही अपघात किंवा समस्या उद्भभवणार नाहीत. याशिवाय महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त असलेल्या विद्युत वाहिन्या त्वरीत दुरुस्त करण्यासंदर्भात महावितरण विभागाला नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी निवेदन दिले असून येत्या दोनच दिवसांत वीज वितरण कंपनी संबंधित कामांना सुरुवात करणार असल्याचे कळविले आहे.

You cannot copy content of this page