Tuesday, May 30, 2023
Homeपुणेमावळवडगांव मावळ मंडल कार्यालय व तलाठी कार्यालय नवीन इमारत भूमिपूजन समारंभ संपन्न...

वडगांव मावळ मंडल कार्यालय व तलाठी कार्यालय नवीन इमारत भूमिपूजन समारंभ संपन्न…

मावळ (प्रतिनिधी) :आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातुन वडगाव मावळ येथे मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय इमारत बांधण्यात येणार आहे.या कामाचा भूमिपूजन समारंभ सोमवार (दि.7) रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाला.
या कामासाठी एकूण 40 लक्ष 76 हजार रु.निधी उपलब्ध झाला आहे.या कार्यालयांच्या इमारतीच्या कामास लगेच सुरुवात केल्याबद्दल नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला आहे.मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय सुसज्ज होणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होईल व तत्पर सुविधा उपलब्ध होतील.असे मत यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी व्यक्त केले.
तलाठी हा शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो. शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्यावत रहावेत.तसेच विविध नोंदणी,दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते.तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेमध्ये कामकाज करावे लागते व अनेक अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागतो.वडगावात सुसज्ज कार्यालय झाल्यानंतर सामान्य नागरिकांसह कर्मचारी वर्गाचेही कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या जागेमध्ये तलाठी कार्यालय असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनिल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, अतुल राऊत, मंगेश खैरे, प्रवीण ढोरे, माजी उपसरपंच अविनाश चव्हाण, विशाल वहिले, संतोष खैरे, किसनराव वहिले, गंगाराम ढोरे, नितिन भांबळ, सुरेश कुडे, बाळासाहेब भालेकर, संतोष निघोजकर,मजहर सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page