Sunday, July 13, 2025
Homeपुणेवडगाववडगांव मावळ येथील धक्कादायक प्रकार, एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलं बेपत्ता…

वडगांव मावळ येथील धक्कादायक प्रकार, एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलं बेपत्ता…

मावळ (प्रतिनिधी):वडगाव शहरातील माळीनगर भागात एकाच घरातील तीन लहान भावंडे बेपत्ता झाल्याची खळबळ जनक घटना दि.31 ऑक्टोबर सायंकाळी 8:00 वा. च्या सुमारास उघडकीस आली.याबाबत आपल्या मुलांचे अपहरण झाले असावे अशी शंका व्यक्त करत मुलांच्या पालकांनी या प्रकरणी गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दाखल केली.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादवी क. 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वडगांव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीनगर मधील फिर्यादी यांच्या राहत्या झोपडीसमोरून त्यांचा 13 वर्षीय मुलगा आणि 11 वर्षीय व 9 वर्षीय दोन मुली अशी तिनही भावंडे बेपत्ता झाली आहेत.
तिनही मुलांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फुस लावुन पळवुन नेले असून त्या अज्ञात व्यक्तीविरूध्द कायदेशीर फिर्याद असल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म.पोसई मोहीते हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page