Monday, December 4, 2023
Homeपुणेवडगाववडगांव मावळ रेल्वे स्टेशनवर आढळला 19 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह…

वडगांव मावळ रेल्वे स्टेशनवर आढळला 19 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह…

मावळ (प्रतिनिधी): वडगांव रेल्वे प्लॅटफॉर्म वर 19 वर्षीय युवकाचा मृतदेह दि.13 रोजी आढळून आला आहे.
सदर मयत हे वय अंदाजे 19 वर्षीय युवकाचे असून हा वडगांव मावळ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म वरील बाकड्यावर मृत अवस्थेत मिळून आला आहे.
या मयताची कोणतीही ओळख मिळाली नसल्याने पुणे रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मृत युवकाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.
अनोळखी युवक वय अंदाजे 19 वर्ष, उंची 5 फूट 1 इंच,अंगाने सडपातळ, रंग काळा सावळा,नाक सरळ असे असून त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट असा पहेरावा आहे. सदर व्यक्ती कोणाच्या परिचयाची अथवा नातेसंबंधातून असल्यास.
पुणे रेल्वे पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे रेल्वे पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page