Thursday, September 28, 2023
Homeपुणेवडगाववडगांव मावळ हद्दीतील धक्कादायक घटना, दारूच्या नशेत विवाहित महिलेवर बलात्कार…

वडगांव मावळ हद्दीतील धक्कादायक घटना, दारूच्या नशेत विवाहित महिलेवर बलात्कार…

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या तक्ररीनुसार सोमवार दि.30 रोजी संबंधित आरोपीविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि.26 रोजी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावातील व्यक्तीने दारु पेवून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पिडीत महिलेच्या घरात घुसून महिलेवर जबरदस्ती करून पिडीत महिलेचे नाक तोंड दाबून शारिरिक संबंध केले आहे.
या संदर्भात संबंधित व्यक्तीच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे करत आहेत.
- Advertisment -