वडगांव शहरातून कॅण्डल मार्च काढून स्वराला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली…

0
70

वडगांव मावळ (प्रतिनिधी ): मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावामधील सात वर्षीय स्वरा चांदेकर हिची अत्यंत विकृतपणे निंदणीय हत्या झाल्याने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अशा अमानवी कृत्य करणा-या नराधमाला कडक शासन झाले पाहिजे याकरिता मोरया महिला प्रतिष्ठान वडगांव व मोरया ढोल पथक आणि शहरवासीयांच्या वतीने कॅन्डल मार्च निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, मा. उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, उद्योजक राजेश बाफना, अतुल वायकर, अतुल राऊत, विवेक गुरव, सचिनभाऊ कडू, मंगेश खैरे, शरद ढोरे, सिद्धेश ढोरे, दिनेश पगडे आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या, मोरया ढोल पथकाचे सदस्य तसेच वडगाव शहरातील नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हि केस जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी तसेच शासनाने या आरोपीला अतिशय कडक शासन करावे जेणेकरून या विकृत प्रवृतींना आजन्म कारावास व्हावा अशी मागणी नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा पुनमताई जाधव, प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अबोली ढोरे, विवेक गुरव, चंद्रजीत वाघमारे यांनी व्यक्त केली.

चिमुकली स्वरा हिच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च मोर्चात शहरातील नागरिक सहभागी होत तीव्र निषेध नोंदवून या बालिकेला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.