वडगावमध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे लागणार फोटो फ्लेक्स आणि होणार कठोर कारवाई..

0
160

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतच्या वतीने उघड्यावर कचरा टाकनाऱ्यांवर होणार कठोर कारवाई.

वडगाव नगरपंचायत ही शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात सहभागी झाली असून शहरातील वेगवेगळ्या भागात स्वच्छता राखणे, वृक्षारोपण करणे, साफसफाई करणे आदी कामांना सुरुवात झाली आहे.

वडगाव नगरपंचायत कडून वडगाव हद्दीतील कातवी परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत. त्यातच साफसफाई केलेल्या रोडलगत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिक यशवंतनगर परिसरातून एमआयडीसी कडे जाताना रस्त्यावर सर्रासपणे कचरा उघड्यावर टाकतात आणि निघूण जातात.

आज वडगाव नगरपंचायत प्रशासनाने कठोर पाऊले उचलत येथील परिसरात स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. आज सकाळी वडगाव नगरपंचायत प्रशासनातील स्वच्छता आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी या परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली. वडगाव शहर हद्दीत नगरपंचायतच्या वतीने चार भरारी पथके तयार केली असून येथून पुढील काही दिवसांत कचरा उघड्यावर टाकताना जे कोणी नागरिक आढळून येतील त्यांचे या परिसरात फ्लेक्सवर नावासहीत फोटो लावण्यात येतील आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे, आरोग्य समिती सभापती राहुल ढोरे यांनी दिला आहे.