वडगाव भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप !

0
16

वडगाव मावळ : वडगाव भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना लक्ष्य अंत्योदय प्रण अंत्योदय या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेतून भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले . वडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील डेक्कन हिल्स जवळील ठाकरवाडी येथे असलेल्या शाळेत हा उपक्रम घेण्यात आला .

यावेळी मा . सभापती गुलाबराव म्हाळसकर , नगरसेवक प्रविण चव्हाण , किरण म्हाळसकर , भूषण मुथा , माजी नगरसेवक ऍड. विजय जाधव , प्रसाद पिंगळे , रविंद्र काकडे, मा . सरपंच नितीन कुडे , मा . अध्यक्ष नारायणराव ढोरे , किरण भिलारे , सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर , मकरंद बवरे , युवा अध्यक्ष विनायक भेगडे , महेंद्र म्हाळसकर , कल्पेश भोंडवे , सोमनाथ पवार आदी जण उपस्थित होते .

यावेळी झालेल्या कार्यक्रमात मा . सभापती गुलाबराव म्हाळसकर , नारायण ढोरे , प्रसाद पिंगळे , किरण म्हाळसकर आदिंनी मनोगत व्यक्त केले . तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मा . सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात दिली . माळी सर यांनी शुभेच्छा देताना सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे यांनी केले . तर आभार भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विनायक भेगडे यांनी मानले.