वडगाव मावळ पोलिसांचा गुटखा विक्री करणाऱ्या सुपर मार्केटवर छापा..

0
224

वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलिसांनी गुटखा विक्री करणाऱ्या एका सुपर मार्केटवर कारवाई करत तब्बल 27 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी वडगाव पोलिसांनी चंद्रशेखर रामजस यादव ( रा . वडगांव फाटा , मुळ रा . हतवा उपाध्यायपुर ग्रॅट , ता . मनकापुर जि . गौंडा राज्य उत्तरप्रदेश ) यास अटक केली आहे .

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वडगावच्या हद्दीतील वडगांव फाटा ते उर्से गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या रामयास सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा , पान मसाला सुगंधित सुपारी आदींची चोरून विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार श्रीशैल कंठोळी यांना मिळाली होती.त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर किराणा मालाच्या दुकानावर छापा टाकत कारवाई करून सुमारे 27 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.