वडगाव मावळ हद्दीत 36 वर्षीय महिलेचा खून, निर्वस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह !

0
988

वडगाव मावळ : हद्दीतील एका विवाहित महिलेला अज्ञात आरोपींनी निर्वस्त्र करून डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी ( दि.13 ) रोजी दुपारी 3 च्या सुमारास तळपेवाडी माळेगाव बु. ता . मावळ येथे घडली

फसाबाई साळू निसाळ (वय 36 रा . तळपेवाडी , माळेगाव बुद्रुक ता.मावळ ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत फसाबाई निसाळ व त्यांचे पती साळू निसाळ हे धरणाच्या शेतात फरसबी लावण्याचे काम करत असताना फसाबाई या दुपारी पडाळी वरच्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्या व साळू निसाळ शेतात काम करत होते. साळू निसाळ हे सायंकाळी पडाळी वर गेले असता , पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निर्वस्त्र पडल्याचे पाहिले. त्याबाबत त्यांनी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती देताच पोलीस हवालदार श्रीशैल कंटोळी व होमगार्ड सुरेश शिंदे यांनी घटना स्थळी धाव घेतली. तसेच मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

सदर गुन्ह्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या गुन्ह्याचा छडा लावून गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून त्या दृष्टीने वडगाव पोलीस तपास करत आहेत.