वडगाव येथील SSC च्या विध्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे !

0
30

वडगाव मावळ 15 : वडगाव शहर भाजपा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कोरोना महामारीच्या मागील दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दहावीच्या परीक्षा या ऑफलाईन पध्दतीने सुरू झाल्या होत्या. परंतु यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेत असल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर , उच्छाह वाढविण्यासाठी वडगाव शहर भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रज्योत म्हाळसकर यांच्या संकल्पेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी दिली आहे.

यावेळी वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे , मा . अध्यक्ष मनोज ढोरे , गटनेते दिनेश ढोरे , स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा , प्रसाद पिंगळे , शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शेखर वहिले , जेष्ठ नेते मधुकर वाघवले , शाळेचे पर्यवेक्षक पी . बी . कांबळे , अजय महामुनी , एस . एम . गायकवाड , प्रमोद म्हाळसकर , रविंद्र म्हाळसकर , युवक अध्यक्ष विनायक भेगडे , शरद मोरे , मकरंद बवरे , हरीश दानवे , संतोष म्हाळसकर , अमोल धिडे , संदीप म्हाळसकर , सुनिल म्हाळसकर , चेतन बाफना , शिवानंद कटणाईक आदिंसह वडगाव शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.