Thursday, September 28, 2023
Homeपुणेवडगाववडगाव येथे घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद...

वडगाव येथे घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

वडगाव : आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला.

नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूर प्रकाशराव ढोरे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत वडगाव नगरपंचायत माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाईन विविध कलात्मक स्पर्धां तसेच वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष, नामदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शासकीय विश्रामगृह वडगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक माऊलीभाऊ दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, चंद्रजीत वाघमारे आणि स्पर्धक उपस्थित होते.

माझी वसुंधरा 2.0 अभियान स्पर्धा गटनिहाय निकाल
निबंध स्पर्धा इयत्ता पाचवी ते बारावी…

प्रथम क्रमांक – चैतन्य परमेश्वर भोरे,
द्वितीय क्रमांक – समर्थ वैभव पुंडे,
तृतीय क्रमांक – सार्थक सतिश बारावकर,
चित्रकला स्पर्धा पहिली ते चौथी…
प्रथम क्रमांक – रिदीमा योगेंद्र ठोंबरे,
द्वितीय क्रमांक – श्लोक चंद्रशेखर जाजू,
तृतीय क्रमांक – आयेशा युसूफ शेख,
चित्रकला स्पर्धा पाचवी ते अकरावी…
प्रथम क्रमांक – गार्गी मुकुंद ढोरे,
द्वितीय क्रमांक – अतिष रंदीप गिरे,
तृतीय क्रमांक – संस्कार मिनानाथ शिंदे,

चित्रकला स्पर्धा बारावी ते खुला गट…
प्रथम क्रमांक – दामिनी वाघवले,
द्वितीय क्रमांक – जोत्सना जैन,
तृतीय क्रमांक – कविता मोरे,
जिंगल स्पर्धा खुला गट…
प्रथम क्रमांक – सुष्मा चंद्रशेखर जाजू,
द्वितीय क्रमांक – वसुमती अंनतराव दांडगे,
तृतीय क्रमांक – वैशाली सुनील टोपने,
वक्तृत्व स्पर्धा खुला गट…
प्रथम क्रमांक – प्रणोती गणेश कुंभार,
द्वितीय क्रमांक – साक्षी सचिन जोगळेकर,
तृतीय क्रमांक – रोहिणी परमेश्वर भोरे,

आदरणीय नामदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा गटनिहाय निकाल.

वक्तृत्व स्पर्धा पहिली ते सातवी गटात…
प्रथम क्रमांक – शार्वी चंद्रशेखर जाजू,
द्वितीय क्रमांक – श्रेया बाळासाहेब दंडेल,
तृतीय क्रमांक – मीनाक्षी सोमनाथ धोंगडे,
वक्तृत्व स्पर्धा आठवी ते दहावी गटामध्ये…
प्रथम क्रमांक – समृद्धी अंनता शेलार,
द्वितीय क्रमांक – अमृता विलास जगताप,
तृतीय क्रमांक – भक्ती महेश डोईफोडे हिने पटकाविला असून,
वक्तृत्व स्पर्धा अकरावी ते खुला गट…
प्रथम क्रमांक – प्रमिला धोंगडे,
द्वितीय क्रमांक – प्रणित निगडे,
तृतीय क्रमांक – विशाखा पाटील हिने मिळविला.

नुकत्याच झालेल्या या दोनही ऑनलाईन स्पर्धेत जवळपास 245 स्पर्धकांनी उत्साही सहभाग नोंदवला.

यावेळी कोरोनाचे नियम पाळून बक्षीस समारंभाचे नियोजन करण्यात आले होते, विद्यार्थी, शिक्षक वर्ग तसेच पालक वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.

सर्व नागरिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -