Friday, June 2, 2023
Homeपुणेवडगाववडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी...

वडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी…

वडगाव : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगसेविका शारदाकाकू ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, गणेश जाधव आणि नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

१४ एप्रिल हा दिवस “वर्ल्ड नॉलेज डे” म्हणूनही संपूर्ण देशभर साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी मिलिंदनगर मधील कु.नम्रता प्रवीण भालेराव व कु.श्रेया राजेंद्र ओव्हाळ या दोन विद्यार्थीनींनी सलग अठरा तास अभ्यास करुन बाबासाहेबांना मानवंदना देण्याचा दृढ विश्वास पूर्ण केला तसेच येथील समाजमंदिरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि मिलिंदनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मधुबन कॉलनी येथील श्रीराम मित्र मंडळ सभामंडपात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मंडळाचे अध्यक्ष अंकुश तुमकर आणि स्थानीक नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page