वडगाव रेल्वे स्टेशन हद्दीत रेल्वेच्या धडकेने एका अज्ञात इसमाचा मृत्यू…

0
143

वडगाव मावळ : वडगाव रेल्वे स्टेशन हद्दीत हैद्राबाद रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेने 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.21 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार सदर मयताच्या ओळखीचा कोणताही पुरावा रेल्वे पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे सध्या बेवारस मयत दाखल करून पुढील तपास वडगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे जाधव करत आहेत.

बेवारस मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग गहू वर्ण, वय अंदाजे 50 ते 55 असल्याचा अंदाज असून. मयताच्या उजव्या हातावर त्रिशूल ॐ व राजू असे गोंधलेले आहे. सदर बाबत काही माहिती मिळाल्यास वडगाव मावळ रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.