वडगाव लोक अदालतिमध्ये 667 केसेस निकाली तर 16 लाखाचा महसूल जमा…

0
76

वडगाव मावळ : मावळ तालुका विधी सेवा समिती व वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव न्यायालयामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये फौजदारी , दिवाणी , तसेच दाखल पूर्व अशा एकुण 667 केसेस निकाली निघाल्या आहेत . तर तब्बल 3 कोटी 16 लाख 72 हजार 540 रुपयाचा महसूल जमा झाला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मच्छिंद्र घोजगे यांनी दिली.

वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही . डी . निंबाळकर , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पी . जी . देशमुख , वडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व मावळ तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सी . आर . उमरेडकर , सह न्यायाधीश बी . व्ही . बुरांडे , एस . जे . कातकर , एस . आर. बर्गे , पी . एम . सूर्यवंशी , जी . एस . पाटील , तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मच्छिंद्र घोजगे , उपाध्यक्ष ॲड. अविनाश पवार , सचिव ॲड. हेमंत वाडेकर , खजिनदार ॲड . शैलेंद्र घारे , सदस्य अजय घोजगे , धनेश पटेकर , निलेश हांडे , तसेच जेष्ठ विधी , ॲड. राजेंद्र गाडे पाटील , ॲड. अशोकराव ढोरे , ॲड . संजय वांद्रे , राजेंद्र भंडारी , प्रतापराव शेलार , गणेश शिराळकर , पांडुरंग काळे , महेंद्र खांदवे , यांसह अनेक विधीन लोकअदालत विधीत सहभागी झाले होते . विधी सेवा समितीचे सुनील केवटे आदींच्या उपस्थितीत लोकअदालत संपन्न झाली . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही . डी . निंबाळकर यांनी आपआपसातील भांडणे मिटविण्यासाठी लोकन्यायालय म्हणजे एक सुवर्ण संधी आहे . त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा , असे आवाहन केले.

पी . जी . देशमुख व सी . आर . उमरेडकर यांनी माणसाने आपला अहंकार व मतभेद बाजुला ठेवून लोकन्यायालयात आपले वाद सामंजस्याने मिटवावेत , असे आवाहन केले . नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे . त्यांचे वाद मिटविण्यासाठी सर्व वकील प्रयत्न करत असल्याचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मच्छिंद्र घोजगे व सचिव ॲड. हेमंत वाडेकर यांनी सांगितले . यावेळी ॲड. रविंद्र विनोदे , ॲड . दिपेश म्हाळसकर , ॲड. शैलेश पडवळ , ॲड. प्रतिक देशमुख , ॲड . अश्विनी ढाकोळ , ॲड . वनिता शिंदे , ॲड . मृणाल टिळेकर , ॲड . सुरेखा जोरी , ॲड . राजश्री कडलक , ॲड . अश्विनी राऊत , ॲड . रुबिया तांबोळी , ॲड . स्वरूपा रंगारी , ए . पी . भक्त , ॲड . डिपंल राठोड यांनी पॅनेल जज म्हणून काम पाहिले.