वडगाव शहराच्या मुख्य चौकास ” संविधान चौक ” नाव देण्यासाठी नगरपंचायतीस निवेदन !

0
140

वडगाव मावळ : पंचायत समिती, शासकीय निवास स्थान व नवीन प्रशासकीय इमारत चौकाला संविधान चौक तर वडगाव न्यायालय ते तहसील कार्यालय मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण करण्याची मागणी सर्व आंबेडकरवादी राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

वडगाव नगरपंचायत हददीतील विविध रस्त्याचे नामकरण करण्याच्या मागणी साठी विविध राजकिय पक्ष व संघटना आपआपल्या पक्षाच्या वतीने जोर धरु लागल्या आहेत .त्या अनुषंगाने आंबेडकरवादी सर्व राजकिय पक्ष व सामाजिक संघटना वडगाव मावळच्या वतीने 1) पंचायत समिती , शासकीय निवासस्थान , नविन प्रशासकीय इमारत या चौकाला “संविधान चौक” 2) तर वडगाव न्यायालय ते तहसिल कार्यालय या मार्गाला “विश्वरत्न परमपुज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग” असे नाव दयावे. इत्यादी मागण्यांचे निवेदन वडगाव नगरपंचायत ला देण्यात आले आहे.

यावेळी दिपक ना.भालेराव, राजु शांताराम गायकवाड, भरत मोरे, राजेंद्र ओव्हाळ, प्रमोद भालेराव, प्रकाश गायकवाड, जेष्ठ नागरिक देवराम ओव्हाळ, उद्धव वाघमारे, प्रदीप मनवर, विशाल ओव्हाळ व भीमसेन भालेराव आदी आंबेडकरवादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.