वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत शिंदे यांची निवड…

0
53

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत निवृत्ती शिंदे यांची निवड करण्यात आली.

आज वडगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आढावा बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, मावळ सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संजय शेडगे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज यशवंत निवृत्ती शिंदे
यांना वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.