Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळारायवूड -जुना खंडाळा रोडवर वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, वीजपुरवठा खंडित..

रायवूड -जुना खंडाळा रोडवर वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, वीजपुरवठा खंडित..

लोणावळा, : रायवुड – जुना खंडाळा रोडवरील रवी सोसायटीजवळ एक मोठे वडाचे झाड आज रात्री साडेनऊ त वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर व एमएसईबीच्या तारांवर पडले. या अपघातामुळे रायवुड ते जुना खंडाळा रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, वीज पुरवठाही खंडित झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा नगरपरिषदेच्या वृक्ष विभागाचे अधिकारी जितेंद्र राऊत आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित झाड कापून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले आहे.
आज दुपारी लोणावळा-खंडाळा परिसरात जोरदार वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांसह पावसाने काही काळ हजेरी लावली होती. त्यानंतर रात्री हे झाड पडले. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्याने सुरुवातीच्या पावसात वार्‍याचा जोर आणि विजांचा प्रकोप अधिक असतो.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी पावसापासून आडोसा म्हणून झाडांच्या खाली उभे न राहता सुरक्षित स्थळी थांबावे, नागरिकांनी वादळ आणि पावसाच्या वेळी घरात सुरक्षित राहावे. सार्वजनिक ठिकाणी झाडांखाली किंवा वीज वाहक तारांजवळ थांबणे टाळावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page